गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? जाणून घ्या गुरुपूजनाची पद्धत आणि महत्त्व
महानुभाव पंथिय अनुयायी गुरुंचे पूजन पविते पर्वाला अर्था नारळी पौर्णिमेला करतात. कारण परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्व श्रीचक्रधर भगवंतांच्या सान्निध्यात भक्तजनांची पविते पर्वाच्या दिवशी सर्वज्ञांचे पूजन केले होते. ते प्रमाण माणून महानुभाव पंथातील शिष्यवर्ग आपापल्या गुरुंचे पूजन करतात. पण इतर सर्व भारतातील लोक आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन करतात.
आपल्या भारतात गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. वेदव्यास हे ऋषी पराशर यांचे पुत्र होते. धार्मिक मान्यतेनुसार शास्त्रानुसार महर्षी वेद व्यास हे तिन्ही कालखंडाचे पुर्ण जाणकार मानले जातात.
आपल्या भारत देशात गुरूंचा / शिक्षकांचा आदर केला जातो. कारण गुरू ही एकच अशी व्यक्ती असते जो आपल्या शिष्याला चुकीच्या मार्गावरून काढून योग्य मार्गावर ; सन्मार्गावर आणतो. पौराणिक कालखंडाशी संबंधीत अशा अनेक कथा आहेत, ज्या वाचल्याने आपल्या लक्षात येते की, कोणत्याही व्यक्तीला महान बनवण्यात गुरूचे विशेष योगदान असते. आताचेच सर्वात प्रसिद्ध उदाहरण द्यायचे झाले तर शिवाजीराजांचे गुरु दादोजी कोंडवांनी रामदासांनी शिवाजीराजांना शस्त्रविद्येचे, राज्यव्यवस्थेचे धडे दिले.: गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा करण्यामागचे एक कारण असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद्भागवत आणि अठरा पुराण यांसारखे अद्भुत साहित्य रचणारे महान गुरु महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. शास्त्रात आषाढी पौर्णिमा ही वेदव्यासाची जन्मवेळ मानली जाते. त्यामुळे आषाढ महिना गुरुपौर्णिमेचा सण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. आणि यावर्षी गुरुपौर्णिमा 13 जुलै रोजी साजरी होत आहे. या दिवशी सर्व शिष्य आपापल्या गुरूंचे शिक्षकांचे आशीर्वाद घेतात आणि आतापर्यंत गुरुंनी जे काही ज्ञान दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतात.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व :- गुरूशिवाय शिष्याच्या जीवनाला अर्थ नाही. रामायणापासून महाभारतापर्यंत त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग या चारही युगात गुरूचे स्थान सर्वात महत्त्वाचे आणि सर्वोच्च राहिले आहे. गुरूंचे महत्त्व अनेक काव्यांमध्ये वर्णिलेले आपल्याला आढळेल. काही भाग्यवंत शिष्य असेही होऊन गेले. ज्यांना परमेश्वरच गुरु म्हणून लाभला. जसे० अर्जुनाला, उद्धवाला श्रीकृष्णभगवंत गुरु लाभले. यदुराजा, सनकादिक ऋषि, विवश्वत राजा. मदळसा माता यांना श्रीदत्तात्रेय प्रभु गुरु म्हणून लाभले. ते थोर भाग्यवंत शिष्य.
महर्षी वेदव्यास यांच्या नावामागेही एक कथा आहे. असे मानले जाते की महर्षी व्यासांनी वेदांना वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले आधी वेदांचे वर्गीकरण तीन विभागात होते. नंतर व्यासांनी त्याचे चार विभाग केले. त्यांना १) ऋग्वेद, २) यजुर्वेद, ३) सामवेद आणि ४) अथर्ववेद अशी नावे दिली. अशाप्रकारे वेदांचे विभाजन केल्यामुळे ते वेदव्यास म्हणून प्रसिद्ध झाले.महर्षी वेदव्यास यांच्या नावामागेही एक कथा आहे. असे मानले जाते की महर्षी व्यासांनी वेदांना वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले आधी वेदांचे वर्गीकरण तीन विभागात होते. नंतर व्यासांनी त्याचे चार विभाग केले. त्यांना १) ऋग्वेद, २) यजुर्वेद, ३) सामवेद आणि ४) अथर्ववेद अशी नावे दिली. अशाप्रकारे वेदांचे विभाजन केल्यामुळे ते वेदव्यास म्हणून प्रसिद्ध झाले.
गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी? : गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची पूजा केली जाते. गुरुपौर्णिमेचा सण आपल्या जीवनातील गुरुचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटवस्तू देतात, काही गोड पदार्थ संपादतात. गुरुंना घरी बोलावून भोजन घालतात. आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. ज्यांचे गुरू आता या जगात नाहीत तेही गुरूंची आठवण करून गुरुतुल्य व्यक्तींची पूजा करतात. या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. सर्व शास्त्रात ‘गुरु’ हे सर्वात पूज्य मानला गेलेले आहेत.जगात प्रत्येक महान व्यक्तींचा आदर व्हावा म्हणून एक दिवस असतो. तो दिवस म्हणजे ‘गुरु पौर्णिमा’. हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि मुडिया पूनो अशी पर्यायी तीन नावे आहेत. हिंदू धर्मात हा एक महत्वाचा सण आहे, लोक उत्साहाने गुरुपौर्णिमा साजरी करतात. हा दिवस संधीकाळही आहे. कारण या वेळेपासून पाऊस वेगाने वाढतो. प्राचीन काळी ऋषी, मुनी, संत -महंत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असत. चौमासा किंवा पावसाच्या वेळी ते चार महिने एकाच ठिकाणी राहत असत. आषाढच्या पौर्णिमेपासून ते ४ महिने मुक्काम करत असत, म्हणूनच या ४ महिन्यांत प्रमुख उपवास सण येतात. या चार महिण्याच्या कालावधीला चातुर्मास असेही म्हणतात.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वजण गुरुंची भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांच्या सुखी निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देतात. या दिवशी प्रसाद म्हणून साखर-तुपाचा शिरा वाटला जातो. बंगालचे साधू या दिवशी मुंडण करून परिक्रमेला जातात. सर्वांचा गुरु परमेश्वर म्हणून व्रज, गोकुळ प्रदेशात हा उत्सव ‘मुडिया पूनो’ या नावाने साजरा केला जातो आणि गोवर्धन पर्वताभोवती परिक्रमा केली जाते. कोणी या दिवशी देवाची पूजा करतात तर कोणी आपल्या दीक्षा गुरुंची पूजा करतात. मठ, मंदिरे, आश्रमांमध्ये हा दिवस थाटामाटात साजरा केला जातो. भारतात पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र साजरा होतो.
*गुरुपौर्णिमा आषाढच्या पौर्णिमेलाच का साजरी केली जाते?* आषाढाच्या पौर्णिमेला हा सण साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की जेव्हा काळे ढग दाटून येतात आणि मुसळधार पाऊस पडतो तेव्हा गुरू हा चंद्रासारखा असतो, जो काळ्या ढगांपासून पृथ्वीला प्रकाश देतो. 'गुरु' या शब्दाचाच अर्थ त गुरुंचे महत्व :- तन मन धन अर्पण करून गुरुकडून ज्ञान मिळवा. परंतु शास्त्रांचे हे बोलणे न स्वीकारल्याने आणि देह-संपत्तीचा अभिमान बाळगून अनेक मूर्ख संसारातून वाहून गेले, गुरुपदात गुंतले नाहीत. व्यवहारातही गुरूंच्या आज्ञेनुसार सज्जनाने वर्तन केले पाहिजे. सद्गुरु म्हणजे जो जन्म आणि मृत्यूवर मात करण्यासाठी आध्यात्मिक साधना करतो. आणि शिष्यांनाही ती साधना शिकवतो तोच यथार्थ गुरु होए.
गुरु आणि परिस / पारस (लोखंडाचे सोने करणारा पाषाण) यात फार मोठा फरक आहे हे सर्व संतां - जाणत्यांना माहीत आहे. कारण परिस फक्त लोखंडाचे सोन्यात रूपांतर करतो, पण गुरू शिष्याला स्वतःइतका महान बनवतो. किंबहुना स्वतःपेक्षाही महान बनवतो. शिष्याचे अंतःकरण, मन अज्ञानाच्या चिखलाने भरलेला असते, गुरूने दिलेले ज्ञान तेच तो अज्ञानरूप चिखल धुण्यासाठी असते. गुरुवर्य जन्मजन्मांतराचे दुष्कृत्य क्षणात नष्ट करतात. म्हणून गुरुंचे महत्व अनन्य असाधारण आहे
गुरू हा एकप्रकारे कुंभार असतो आणि शिष्य हा मडके असतो, आतून हाताचा आधार घेऊन आणि बाहेरून मारून-मारून शिष्याची दुष्कृत्ये बाहेर पडतात आणि आकारयुक्त सुंदर सद्गुणांनी भरलेला शिष्य तयार होते. या जगात गुरूसारखा दुसरा दाता नाही आणि शिष्यसारखा विनंती करणाराही कोणी नाही. कारण गुरूंनी त्रिलोकाच्या संपत्तीपेक्षा अतिशय श्रेष्ठ असे ज्ञानाचे दान दिले
गुरुंना आपल्या मस्तकाचा मुकुट मानून त्यांच्या आदेशाचे पालन करा. संत म्हणतात, असा शिष्य-सेवक सर्व जगाला घाबरत नाही. आणि गुरुंची आज्ञा पाळणारा शिष्य सर्व जगात पुजनिय होतो. गुरूंची सेवा करणे कधीही थांबवू नका, सतत सेवा करत राहाल, गुरुसान्निध्यात राहाल तर तुमच्या जीवनातला सर्व अंधार नाहीसा होईल.
ज्ञान, संतसंगती, सर्वांबद्दल प्रेम, सुख, दया, भक्ती, सत्य, शांती हे सर्व खर्या श्रीगुरूच्या आश्रयाने वास करतात. आणि शिष्याला हे सर्व गुरूंच्या सेवेतून, गुरुंच्या अनुकरणातून प्राप्त होतात. सगळ्या पृथ्वीचा कागद करून आणि लेखणीसाठी सर्व जंगल, अरण्य, वापरले आणि, सात समुद्रांची शाई तयार करून गुरुंचे गुण वर्णन केले तरी ते पूर्ण करता येणार नाही. या सर्व वस्तु कमी पडतील.
0 टिप्पण्या