पप्पा आज एक महिना झाला .....
दिवसांमागून दिवस जात आहेत पण तुम्ही आमच्या सोबत नाहीत यावर अजून ही विश्वास बसत नाही,
काही दुःखे अशी असतात की ती ज्यांची त्यांनाच मुक पणे सहन करावी लागतात.
'पप्पा तसे तुम्ही रोजच मनात असता...महिना लोटला पण तुम्ही अजून ही आमच्या रोजच्या जीवनात आमच्या बरोबर असता. तुम्ही केलेल्या संस्कार मुळे...
एक मन असेही म्हणते की तुम्ही आम्हाला महानुभाव पंथाची ओळख करून दिलीत..
धर्म दाखवलात...धर्मावर आम्हाला दृढ केलेत..
महानुभाव पंथाची मुळे आमच्या जीवनी रोवली.धर्माचे संस्कार केलेत, ही खुप मोठी शिदोरी दिलीत...
'पप्पा मी लहान असताना मला लीळा चरित्रातील जुनी मराठी भाषा समजत नव्हती, तुम्ही प्रत्येक सूत्राचा,दृष्टांताचा अर्थ उदाहरण देऊन सोप्या शब्दात सांगितला. तुमचे रोजचे पहाटेचे ३ ते ६ नामस्मरण असायचे📿.आता जेव्हा मी नामस्मरणा साठी उठतो तेव्हा तुमची सतत आठवण येते.आता शास्त्र चर्चा कोणा सोबत करणार?
लहान पणा पासून तर आज पर्यंत तुमच्या मुळे मला स्थान दर्शन प्रसाद वंदन घडले.आता स्थान दर्शनाला जाताना नक्कीच उणीव भासेल.!
कंपनी मधे असताना दरवर्षी तुम्ही निबंध स्पर्धां मध्ये भाग घेऊन पहिल्या तीन क्रमांका मधे येत होते.🏆
आज ही तो दिवस आठवतो सलग तिसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही बक्षिस घेतले. त्यावेळी तुमच्या कामगार मित्रांचा हॉल मध्ये झालेला टाळ्यांचा कडकडाट व शिट्यांचा आवाज त्यानंतर कविता लिखाणाला तुम्ही सुरवात केलीत विविध काव्य संमेलनात भाग घेतलात विविध धार्मिक कार्यक्रमात स्टेज वर जाऊन धर्म प्रचार केलात.🎤
आपल्या परस्थितीशी दोन हात करत तुम्ही आपल्या परमेश्वराला कधी ही विसरला नाहीत ...
मनावर असंख्य आघात होत असताना ही तुम्ही तुमचे परमेश्वरा विषयी असलेले प्रेम,श्रद्धा,भक्ती, आपल्या कवितां मधून लेखा मधून मांडत राहीलात ....त्यात आपले दुःख विसरत राहीलात....आणि पंथा मध्ये आपली वेगळी ओळख तयार केलीत. सर्वजण तुम्हाला कविराज म्हणून ओळखू लागले ...
पप्पा तुम्ही घरावरच नाही तर पुर्ण धर्म बांधवांवर आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि आपल्या लेखणिने राज्य केले ...✒️
या मागे तुमचे गुरु मं.सुकेणेकर बाबा(जुने) यांची प्रसन्नता होती.तुमच्या सर्व कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले..! 📚
तुम्ही सोडून गेल्यावर
नंतर काही दिवसांनी लगेच गोकुळ आष्टमी श्रीचक्रधर जयंती ,श्रीगोविंद प्रभु अवतार दिन हे आपले पंथाचे सण झाले ,त्यावेळी तुमची प्रकर्षाने आठवण झाली, आणि वाईट ही वाटले की तुम्ही आम्हाला पोरके करून गेलात....! 😔
खुप कठिण परिस्थिती मध्ये तुम्ही आम्हाला सांभाळले. मी दहावीला असताना तुमची कंपनी बंद पडली, स्वतः खुप कष्ट केले, कमी पगारावर काम करून आम्हाला आनंदी ठेवले, आमचे सर्व लाड पुरवले, अनेक संकटे अडचणी आल्या सर्वांना सामोरे गेले पण हार नाही मानली.
आणि फक्त दोनच दिवसात
असे अचानक आम्हाला सोडून जाणे मनाला पटत नाही आणि अजूनही विश्वास बसत नाही...😔
आम्हालाच नाही तर आपल्या आई ,वडील ,बहीणी यांच्या साठी आणि त्यांच्या मुलांसाठी, जावई,मेव्हणे,पुतणे या सार्वसाठी खुप काही केले....
समाजात व पंथात खूप मोठं नाव केलं.
पप्पा तुम्ही तुमच्या काव्य रूपाने आमच्या आणि धर्म बांधवांच्या सोबत सतत असणारच....आणि त्यासाठीच तुम्ही तुमचे काव्य लिहीत होतात की काय असा प्रश्न पडतो...!
हा धर्म मनात रूजवायला तुम्ही यशस्वी झालात....
पप्पा आज मनात हेच येते की तुम्ही खरेच परमेश्वराच्या प्रेमाला नक्कीच पात्र झाला असाल...
माझा देव तो स्वामी श्रीचक्रधर तुम्हाला सन्निधान देवोत..! प्रेम दान देवोत..! 👏🏻😔
दंडवत प्रणाम...🙏🏻
सागर बबन सानप
नाशिक
0 टिप्पण्या