कोणाला पाहिजे आहे देव...??




अनादी काळापासून जीव हा दृश सूखाच्या मागे लागून परमेश्वरी सूखाला विन्मूख झालेला आहे दृश सुख म्हणजे संसारी सूख म्हणजे ईंन्द्रियजन्य सूख ते ईंन्द्रियाद्वारे‌ व ताबडतोब मिळणारे  सुख असते आणि परमेश्वरी सूख जे आहे बूध्दीद्वारे ग्रहण करावे लागणारे सुख आहे त्याला मिळण्याला अवधी लागतो म्हणूण जीव हा अनादिकाळापासून संसारातील दृश सूखाच्या मागे लागलेला आहे 

    आपण पूराणात जर पाहिलेतर रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू यांनी देवतेचे तप केले व संसारी सूखच मागितले .

       रावणाने अतिशय घोर तपश्चर्या केली व काय मागीतले तर तो म्हणाला मला चौदा चौकडे राज्य दे अशि मागणी केली

 

     ध्रूव बाळाने तप केले व काय मागीतले मला अढळ पद दे अशी मागणी केली परंतू मला पलमेश्वराची प्राप्ती व्हावी अशी ईच्छा प्रगट केली नाही 

    रावणाचा भाउ कुबेर यांनि देखिल तप केले व सर्व जगाच्या धनाचा स्वामी हौण्याची विच्छा प्रकट केली 

   ही पूराणातिल उदा. आहेत परंतू प्रत्यक्ष भगवान श्री चक्रधर स्वामीच्या भ्रमन कालामध्य परमेश्वर धाया धाया मोक्ष द्यायला तयार होते परंतू कोणीच आले नाही मात्र पिवळीदांडी करून घेण्यासाठी लोकांची जत्रा भरली 

यामध्य लोकांचा परमेश्वर प्राप्तीकडे असलेला आकस व संसाराकडे असलेला ओढा दिसून येतो 

     सर्वज्ञ कनाशीला गेले तेथे एका ब्राह्मणाने केलेल्या सेवेवर प्रसन्न झाले त्याने संसारातील सूखच मागितले सर्वज्ञ त्याला पून्हा पून्हा म्हणू लागले तूमच्या भल्याचे मागा परंतू त्याला संसारी सूखच भल्याचे वाटले तो परमेश्वरी सूख मागण्याकडे मोहरला नाही

 

    याउलट दैव राहटित मात्र अनेक लोकांनी संसारी सूखाला लाथ मारून पारमार्थीक सूखाकडे धाव घेतली यामध्य आचार्य म्हांइभट खेई गोई अशी बोटावर मोजण्या ईतकी मंडळी पारमार्थिक सूख घ्यायला प्रवृत झाली सर्वज्ञाच्या नंतर कांही लोकांनी संसार सूखाला सोडू परमार्थ केला काही ठळक जीवच परमार्थाकडे ओढले गेले व जातात परंतू सरासरी सर्वच जीव संसाराकडेच ओढ घेतात 

       आज आपल्याला बर्याच धर्माचे बरेच कपडे धारी साधुसंतसाधूत्वाचा पेहराव करून रस्त्यावर फिरतांना दिसतात त्यात मी देखिल आलो  त्यांना जवळ बोलवा व म्हणा महाराज आम्ही तुहाला वीस लाख रुपये नगदी देतोत हे कपडे काढून टाका मायबाप हो ते रात्री नाही. दिवसा ढवळ्याकपडे काढून टाकतील व संसारिक सूख मिळवून देणार्यापपैशाकडे धाव घेतिल 

     म्हणूण येथे 

 कोणाला पाहिजे आहे देव  असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

     दंडवत प्रणाम


भोजराज येळमकर

      जिंतूर जि. परभणी