स्वार्थ व धर्म




                   गेल्या कित्येक वर्षाच्या कालखंडात मला जे जे मार्गदर्शन करणारे ईश्वर कुमार भेटले त्याचे कडून तसेच इतरही साधकाच्या माध्यमातून जो धर्म कळला अनुभव घेतला त्यावर अनुभव म्हणून काही गोष्टी मुदामहून मांडाव्यात अस वाटलं.....
 त्याच कारण ही तसेच आहे........

महानुभाव पंथ ही जरा वेगळं मार्गाने नेणारी शिडी आहे....

यात येन म्हणजे निववळ स्वार्थ नव्हे तर हित आहे स्वतःच्या आत्म्याचे.....

कारण ही तसेच आहे..... हि शिडी अंतिम टप्प्यात पोहचवण्यासाठी बनवली गेली आहे.....

त्याचे सर्व काही कार्य साधनदात्याचे जवळ आहे....

परमेश्वराने हा देह दिला तो तुमच्या आमच्या पूर्वक्रमाणे .....

हो परंतु तो मिळालेला देह आपण  ज्याप्रकारे वापरतो तो नक्कीच परमेश्वराने सागितलं त्या विचाराने आहे का?

आपण आपल्या पंथाची धर्माची नियम पाळताना नक्कीच स्वामीच्या कर्मकांड विरहित भक्तीचे रस्त्यावर एकरूप आहोत का?

की निववळ स्वार्थासाठी धर्म पंथ.....

कर्मकांडे नखशिखांत भरलेली.....

अंधश्रद्धा ओतप्रोत भरलेली....

कारण। जीवन प्रवासात......आलेलं दुःख हे आपले कर्माचे फळ असते.....

ते त्याच पद्धतीने भोगावे लागते....

त्यासाठी प्रभूच्या ठिकाणी निसिम भक्ती व श्रद्धा असावी व ठेवावी लागते.....

परंतु स्व हितासाठी कुठंही अंधश्रद्धा मिश्रित भक्ती ही तुम्हास क्षणिक सुख जरूर देणार परंतु अंतिम फळ नक्कीच तुमच्या मनात असेल तस नक्कीच मिळणार नाही.....

लीळाचरित्र ज्यांनी मनातून अभ्यासले असेल त्यासाठी प्रभूच्या काही वचनाची आठवण नक्कीच होईल किंवा त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची नक्कीच आठवण होईल की दुःख भोगून नासवावे लागते.....

त्यासाठी आपल्या देवास देखील नवसाला पाव म्हणणं हे ही कणाशीच्या ब्राम्हण सारखं च होईल....

कारण त्यांनी ही काय मागव हे त्यास कळत नसल्याने .....

ज्या गोष्टी ह्या जन्मात शक्य नव्हत्या किंवा पुढे जाऊन नक्कीच मिळणार होत्या त्याच गोष्टींचा हव्यास धरला....

तसेच काही च असत.....

आपल्या कौटुंबिक स्वार्थासाठी धर्माचा ही स्वार्थ म्हणून उपयोगी आणतात किंवा आणू लागलीत....

कारण सेवा व स्वार्थ ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी.....

कारण ही तसेच.....

जश्या दोन तलवारी एक म्यानात बसणार  अगर बसत नाही.....

तसेच परमेश्वराकडे केलेली स्वार्थी सेवा तथा क्रिया उपयोग दायक नक्की ठरेल पण..... त्यातून मिळणार हे उद्याच आज होईल इतकंच होतील,.....

मात्र ते दुःख भोगूनच नासवल्या शिवाय नक्कीच कमी होणार नाही.....

अनेकदा काय होत......

अन्य लोकासारखं असत.....

ते जसे आपलं स्वार्थासाठी देवतेला भोग म्हणून कोंबडे किंवा बोकड बळी देऊन दोष च जोडता.....

तसेच काही......एखाद्या जीवास त्रास व्हावा अगर कुणाच्या पासून मुक्तता मिळविण्यासाठी अनेक क्रिया धर्म सेवा म्हणून करण्याचा अविर्भाव दाखवतात.....

ते स्वतःला किंवा इतरांना निष्काम वाटेल व वाटणार हो......

ज्याचे ठिकाणी केली किंवा करत असतात तो सर्वज्ञ आहे हेच स्वार्थासाठी विसरले असतात....

अशी अनेक प्रकार आपण पावलोपावली बघत असतो पण आपल्या चशम्याचे धुळीने भरलेल्या काचेतून तो भाग बघितलाच जात नाही......

हो तोच भाग बघणे म्हणजे......

परमेश्वराने सागितलं तसा धर्म जोपासना करणे......

त्यासाठी देवाच वचन जे अनेकांना समजून घ्यावं लागेल....

ते म्हणजे आचरे तयाचा धर्म मग ते संणयस्थ साधक असेल किंवा नामधारक वासनिक असेल त्यांनी आपलं सांसारिक जीवनात असो अगर सनयस्थ जीवनात ......

जर कर्मकांड किंवा स्वार्थासाठी फक्त परमेश्वराकडे जाणार असाल तर ते स्वार्थ तुमच्या क्षणिक स्वार्थ सोडून। अनुसरण्याचे मार्गास अडथळे आणणारे असेल हे लक्षात घ्यावे। हे ध्यान असावे.....


 कारण आपली प्रत्येक क्रिया सेवा ही निवृत्तीचे मार्गास धरून असावी.....

ते स्वार्थ जर सांसारिक भल्यासाठी असेल तर ते क्षणिक सुखफळ तो साधन दाता देईल ही.....

त्याचा हिशोब हा दुसऱ्या डायरीत लिहिलेले राहील विसरता कामा नये.....

म्हणून परमार्गाची सेवा करण्याची भावना देखील निष्काम असावी......

स्वार्थपर नसावी....

सांसारिक सुखफळ म्हणून तर नक्कीच नसावी.....

त्या भावनेतून करत असलेले सेवा धर्म एका दुसऱ्याला धरण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात किंवा होतीलच अस मला तरी वाटत....

तेव्हा प्रत्येकाला एकच विनंती राहील परमार्गाच्या सेवेत स्वार्थ नको निष्काम सेवाच असावी.......

कीव करून देणार असाल तर तुमच्या शिवाय त्याना कोणी देणारा च नाही असा गोड गैरसमज तर नक्कीच करून घेऊ नका.....

सहज सुचलं म्हणून रेखाटलं.....

जर चुकीच वाटलं तर माफ कराल.....

श्रद्धा हवी अंधश्रद्धा नको हीच यामागील हेतू ..... दंडवत