"प्रेत संस्कार"



चला आज "ब्रम्हविद्या" सारातील काही शब्द पाहू....


हो अशी काही शब्द जी विधी तथा संस्कार आहेत त्यासाठी प्रत्येकाने जमेल ती सेवा करावी हे संस्कार करण्यासाठी भाग्यच असतं........


हो अगदी मनापासून सांगतो ह्या साठी कुणालाही मदत करावी.....


कारण यात "संस्कार आहे.....सेवा" आहे....


दिसायला वाचायला खूप लहान वाटतात.....


पण गुणाने खूप संस्कारी असतात.....


त्यातलेच हे एक "संस्कार".....


"प्रेत संस्कार" प्रेत संस्कार म्हणजे अंत्यविधी धर्मशास्त्राप्रमाणे भूमी डाग, जल डाग, अग्नीडाग, वनडाग असे चार प्रकारे अंत्यसंस्कार पार पाडत परंतु आता सद्या तरी तीनच अर्थात "भूमी डाग, जल डाग, अग्नीडाग" हे तीन येतात. महानुभव पंथीयांनी "भूमीडाग" हा अंत्यसंस्कार करावा. अग्निसंस्कार करू नये.  कारण त्यामुळे हिंसा दोष लागून प्रेताला दुःख भोगावे लागते. प्रेताला कमीत कमी दुःख व्हावे हा "भूमीडाग" देण्याचा मुख्य हेतू आहे.

        मृत शरीराला, मृत झाल्यापासून कमीत कमी तीन तास हात लावू नये. स्पर्श करू नये. त्यामुळे प्रेताला दुःख होते. रडून डोळ्यातून पाणी गळणे अथवा रडताना नाकातून येणारा शेंबूड टाकणे वगैरे करू नये. कारण अखेर ते प्रेताला खावे लागते. कारण प्रेत हे पराधीन असते. त्याला यमदूत खाण्यास भाग पडतात. म्हणून निरर्थक शोक करु नये संयम बाळगावा.

        "बाई ते यातना देह की यातना देह की." (आ मा २४४) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू म्हणतात...... "यातना देह म्हणजे दुःख भोगण्यासाठी मिळालेला देह, त्याला यातना देह म्हणतात." प्रेतदेह हा मृत्यूनंतर मिळतो. या प्रेतदेहात हत्तीसारखे शरीर, त्यावर रांजणा एवढे डोके, बोटा एवढी मान, व सुईच्या शिद्रा एवढा गळा असलेला असा देह प्राप्त होतो. सगळे शरीर जणू अंगाला निखारे बांधल्यागत जळत असते. श्वासोच्छ्वास घेताना गळा दाटत असतो.

         मृत्यूपासून म्हणजे त्या दिवसापासून पुढे दहा दिवसापर्यंत तो  प्रेतदेहीया घराच्या वळचणीचे आडोशाने किंवा गावाच्या वेशीपाशी राहून दुःख भोगत असतो. तेथून तो दुसरीकडे जाऊ शकत नाही. हे ठिकाण तो सोडत नाही. डोंगराएवढे अन्न खावे अशी त्याला भूक लागलेली असते. समुद्रातील सर्व पाणी पिऊन टाकावे अशी तहान त्याला लागलेली असते. पण त्याला अन्नाचा कण आणि थेंबभर पाणीही मिळत नाही. यम त्याला ते घेऊ देत नाही. म्हणून हा प्रेतदेहीया आपल्या निमित्त रडणा-यांचे अश्रू पितो. सुतक धरून राहणाऱ्यांना पाहतो. त्यांना रडताना पाहून त्याला फारच दुःख होते. मूळ देहातून निघाला असला तरी त्याचे ममत्त्व अजूनही कायम असते. म्हणून रडणा-यांना पाहून त्यालाही दुःख होते.

 

         त्याला भीती ही फारच वाटते. कोठे एखादे खट्ट वाजले तरी तो घेऊन पळू लागतो. व पळता पळताच मूर्च्छित होऊन पडतो. तो पळताना पाहून एम चला मुद्गलाने बडवतात. त्यामुळे तो अगदी भयभीत होतो. त्याला तहान, भूक, ऊन,  वगैरे पासून फार त्रास होतो. तो त्रास बघताना तो सावली शोधतो. तेथे जाऊ पाहतो पण त्याला यम जाऊ देत नाही. मृतदेहाला जस जसा स्पर्श होतो. तस तसा त्याला त्रास होतो. म्हणून आपला अंत्यसंस्कार लवकरात लवकर करावा असे त्याला वाटते. म्हणून मृत्यूनंतर प्रेत देहाला कमीत कमी तीन तास स्पर्श करू नये. रडू नये.


प्रेतदेहाचे दुःख कसे असते हे गरुड पुराण (अ १४) मध्ये ही वर्णिलेले आहे.


कृत्य कर्माच्या प्रभावान ! क्षुधित-तृषित रात्रदिन !!

छायेसी बैसावया जाण ! तिळमात्र प्रमाण शक्ती नाही !!

नद्यादी वाहत्या उदकाचे पान ! न करावे ऐसी पीडा दारुण !!

शीत उष्ण पर्जन्य दारुण ! अशा यातना भोगून जाण !!

शेखी प्रेतदेह पावोन ! कोटी वर्ष गण आयुष्य !!

       या प्रेत देहापासून मुक्तता व्हावी म्हणून "दशक्रिया" विधी केला जातो.  "प्रेतदेहाचे नर्क बारावर्षे" पर्यंत भोगावे लागतात. आणि ते नासण्यासाठी कर्मराहाटीत दहा दिवस ब्राम्हण भोजन दान क्रिया केल्या जातात.


दंडवत