देव_विकत_मिळेल_का.....?




Krishna 1080P, 2K, 4K, 5K HD wallpapers free download | Wallpaper ...

पाच वर्षांचा ऐक छोटा मुलगा हातात ऐक रुपया घेऊन एका वाण्याच्या दुकानात जाऊन ऊभा राहिला.
  • दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला....?
  • त्या मुलाने दुकानदारास विचारले ..... !
  • तुमच्या दुकानात देव भेटेल का विकत......?
हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून. त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले. तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चोथ्या, पाचव्या, असे कारत करत 40दुकाने फिरला. प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा.... तुमच्या दुकानात देव भेटेल का?
  • शेवटी शेवटच्या दुकानात ऐक म्हातारे आजोबा, दुकानात बसले होते......
  • त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले बाबा तुमच्या दुकानात देव भेटेल का.....?
  • त्या बाबाने विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत....?
मुलाने प्रांजाळ पणाने सांगितले ऐक रुपया आहे. माझ्याकडे.त्या दुकानदाराने मुलाला जवळ घेत विचारले बाळा तुला कश्याला देव हवा आहे........तु देव विकत घेऊन करणार काय ? 

आसा प्रश्न ऐकून मुलाला खूप बर वाटले...... त्याच्या अशा पल्ल्वीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे.

ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार? डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.
  • म्हणून बाबा मी देव शोधतो आहे.
आहे ना तुमच्या दुकानांत देव..............?
  • दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे..........?
फक्त ऐक रुपया.. नको काळजी करू.
  • ऐक रुपयात देखील देव भेटेल..... !
दुकानदाराने तो ऐक रुपया घेतला आणि ऐक रुपयात सध्या ग्लास भर पाणी येते....... म्हणून त्याने ऐक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल. दुसऱ्या दिवशी स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले. आणि आईचें ऑपरेशन झाले. काही दिवसात ती ठीक ही झाली. डीचार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली............. पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर वेक्तीने हे सर्व बिल भरले आहे. आणि सोबतच ऐक चिट्टी आहे.

चिठ्ठी खोलून वाचताच......................

माझे धन्यवाद मानू नकोस,

#तुला_वाचवले_ते_परमेश्वरानेच. मी फक्त निम्मित होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळा दे. जे बाळ 1 रुपया घेऊन देव शोधत फिरत होते. यालाच विश्वास म्हणतात.. देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागतं. श्रद्धा, भाव, विश्वास, असला की ऐक रुपयात ही देव नक्कीच मिळतो. """"""""'"" चला तर आपण ही मनापासुन ह्या महामारी पासून जगाची सुटका करावी म्हणून प्रार्थना करू.""""""""""'"'''"" मी फक्त निम्मित होतो.

तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळा दे. जे बाळ 1 रुपया घेऊन देव शोधत फिरत होते. यालाच विश्वास म्हणतात..


देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागतं. श्रद्धा, भाव, विश्वास, असला की ऐक रुपयात ही देव नक्कीच मिळतो. """"""""'"" चला तर आपण ही मनापासुन ह्या महामारी पासून जगाची सुटका करावी म्हणून प्रार्थना करू.""""""""""'"'''""