विशेष,प्रसाद,काष्ट,स्थान,वासनिक आणि बोधवंत कशाला म्हणतात
पंथीय माहिती*
*प्रश्न १:-* विशेष कशाला म्हणतात?
*उत्तर:-* परमेश्वर संबंधी पाषाणाला विशेष म्हणतात.साधारणत: प्रत्येक वेळी दरदिवशी स्थानाच्या ठिकाणी वंदन करणे शक्य नसल्याने संबंधी पाषाणाचा तुकडा देखील वंदनिय आहे. वस्तु संबंधे शक्ति निक्षेप: याप्रमाणे संबंधी स्थानाच्या ठिकाणी माया व कृपा शक्तिचा निक्षेप असतो व सृष्टी संहारापर्यंत तो अखंड असतो.आजच्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास ज्याप्रमाणे चुंबकाचे कित्येक तुकडे केले तरी प्रत्येक तुकड्यात चुंवकाचे गुण विशेष तसेच अबाधीत असतात. अशा प्रकारे या पाषाणातील विशेषत्वामुळे याला विशेष म्हणतात
.
*प्रश्न २:-* प्रसाद कशाला म्हणतात?
*उत्तर:-* प्रसन्नता पुर्वक दिलेल्या वस्तुला प्रसाद म्हणतात. (व्यक्त संबंधे अव्यक्त प्रसन्नता निक्षेपिति मग आपुला संबंढु म्हणौनि संबंधु वंद्यु)व्यक्त संबंधात अव्यक्त प्रसन्नता निक्षेपणाचा मनोधर्म ज्या संबंधात असतो तो प्रसाद येर ते स्थान प्रसादात कृपा प्रधान व माया शक्ति अनुषंगिक असते.
*प्रश्न ३:-* काष्ट कशाला म्हणतात?
*उत्तर:-* काष्ट म्हणजे लाकुड. ज्या लाकडाला इश्वराचा संबंध झाला त्या लाकडाला काष्ट असे म्हणतात.
*
प्रश्न ४:-* स्थान कशाला म्हणतात?
*उत्तर:-* साधारणत: स्थान म्हणजे जागा, ठिकाण. परंतु आपल्या शास्त्राप्रमाणे परमेश्वराच्या स्पर्श संबंधित जागा म्हणजे स्थान. स्थानाच्या ठिकाणी माया व कृपा या शक्तीचा निक्षेप असतो. यात माया प्रधान व कृपा अनिषंगीक असते.
*प्रश्न ५:-* वासनिक कशाला म्हणतात?
*उत्तर:-* एका परमेश्वरावीन आपला उद्धार होणे शक्य नाही याची जाणीव असुन ज्यात सदासर्वदा अनुसरणाची वासना आहे तो म्हणजे वासनिक. आपुलेया दोषाविषयी पोळे तो वासनिक.
*प्रश्न ६:-* बोधवंत कशाला म्हणतात?
*उत्तर:-* चारही पदार्थाचे यथातथ्य कार्य, कारण, स्वरुप, लक्षण जाणन्याइतपथ बोध होतो व त्यामुळे या संसारबंधनातुन केव्हा मुक्त होऊन सदासर्वदा परमेश्वर प्राप्तीची तळमळ भावतो, तो बोधवंत. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर याचे ज्ञान झाले, परमेश्वर एक मुंचविता आहे, देक़ता जीवाचे मुंचन करु शकत नाही याचे ज्ञान झाले तो बोधवंत.
*प्रश्न ७:-* उपदेश का दिल्या जातो?
*उत्तर:-* ज्ञानलक्षण संबंध हे वंदनिय आहे. म्हणुन अनुसरलेल्या ज्ञानीयाकडुन नाम श्रवण केल्याने त्या नामाद्वारे परमेश्वर मनोधर्माचे संक्रमण होऊन पुढे जीवाची प्रतिकारणता वाढण्यास हे एक निमित्त आहे. तसेच जीव दोषाचे आळे असल्याने ढोबळ मनाने परमेश्वर मार्गाची शिस्त येण्याकरिता उपदेश घेणे आवश्यक आहे.
⬆ *[हि पंथीय माहिती नुतन नामधारकाला होवावी यासाठि हि पोस्ट पाठऊ शकता]
1 टिप्पण्या
Dandawat pranam.
उत्तर द्याहटवाAti sunder