*महानुभावांचा इतिहास***🏳🏳 तेरावे शतक 🏳🏳*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*महानुभावांचा इतिहास***🏳🏳 तेरावे शतक 🏳🏳*
*लेख :-- ✍🏽 (८१)*
*मांगभाव हे महानुभाव नव्हेत*
महानुभाव या शब्दाचा अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे , त्यात महा व अनुभाव असे दोन शब्द अंतर्भूत आहेत , *महा + अनुभाव = महा अनुभाव: यस्य स महानुभाव:* अर्थात ज्याचा अनुभाव म्हणजे ज्ञान , सामर्थ्य महान आहे तो महानुभाव होय , संस्कृत शब्द कोशात अनुभाव याचे अर्थ. १) तेजस्वीपण २) सामर्थ्य , प्रभाव ३) मोठेपणा , महानता व ४) निश्चय असा दिला आहे, तेव्हा महानुभाव हा शब्द व्यापक अर्थाचा ठरतो , ज्याला ज्या शास्त्राचा वा उद्योग व्यवसायाचा प्रचंड अनुभव असतो तो त्या शास्त्राचा वा व्यवसाय कौशल्याचा महानुभाव असतो , उदाहरणार्थ , विज्ञान शास्त्राचांचे विशेष ज्ञान ज्याला असेल तो विज्ञान शास्त्राचा महानुभावच असतो, तसेच इतर उद्योग करणार्यांमध्ये , म्हणजे लोहार , सुतार , तांबटकरी , सोनार व पाथरवट या पांच पांचाळांच्या शास्त्राचामध्ये जो निपुण असेल त्याला सुद्धा महानुभाव हे नाव प्राप्त होते , भगवद्गीतेमध्ये 'गुरुन् हत्वाहि महानुभावान्' या श्लोकात अर्जुनाने द्रोणाचार्यांना महानुभाव हे नाव दिले , कारण द्रोणाचार्य धनुर्विद्येत निपुण होते , त्यांना त्याचे मोठे ज्ञानसामर्थ्य असल्याने त्या विद्येचे ते महानुभावच होते , तसेच हा पंथ म्हणजे परमेश्वराचा ज्ञान मार्ग असल्याने या पंथाला परमेश्वराचे महान ज्ञान प्राप्त झाले आहे , म्हणून यांना महानुभाव असे म्हटले आहे, पण स्वामी श्रीचक्रधरांनी महानुभाव हे नाव दिले नाही , त्यांनी स्वत: या पंथाला *'प्रतीतपंथ,* *महात्मपंथ',* हे नाव दिले .
पुढे श्रीचक्रधरस्वामींच्या पश्चात तेराव्या शतकाच्या प्रारंभी आद्य आचार्य श्रीनागदेवभट यांच्या विद्यमानी प्रतीतपंथ हे नाव जाऊन *'भट मार्ग'* हे नांव पडले , स्वत : आचार्य 'मार्ग' या नावाने संबोधित असत , पुढे आचार्यांच्या पश्चात श्रीकवीश्वरव्यास व परशुरामव्यास यांनी जो कोणी सर्वोत्तम जिज्ञासू व चर्चक महात्मा असेल त्यास *'महानुभाव'* म्हटले आहे , *'महानुभावाचेनि मेळे । लाहिजेति आनंदाचे सोने केळे । मग मनोर्थु वेलीची फळे । हाथी तोडिजेति'* असे कवीश्वरांनी म्हटले आहे, याप्रमाणेच परशुरामव्यासांनी आपल्या स्मृतिस्थळात 'अवघेचि घनदाट महानुभाव बसले आसति' (स्मृति २३३) तसेच मार्ग' हा शब्द या पंथाला लावण्यात आला आहे, पुढे परशुराम व्यासांच्या पश्चात पेटे हरिव्यास , अचळमुरारी व्यास आचार्य होते, तोपर्यंत म्हणजे तेराव्या शतकापर्यंत 'मार्ग' व क्वचित प्रसंगी 'महानुभाव' असे म्हटले जात असे , पुढे चौदाव्या शतकापासून भटमार्ग व परमार्ग हे नाव हळूहळू कमी होऊन महानुभाव हेच नाव रूढ झाले , परंतु मार्ग' हा शब्द नामशेष झाला नाही , अद्यापही महानुभावीय मंडळी मार्ग' हा शब्द वापरतात , दक्षिणगंगा गोदेच्या उभयतीरावर भ्रमण करणार्या श्री चक्रधर स्वामींच्या भ्रमणमंडळास पंथाच्या उदयकालापासून आजपर्यंत महानुभाव पंथास प्रतीत पंथ , भटमार्ग , महात्मपंथ , परमेश्वर पंथ, परमार्ग , अच्युतपंथ सनातन धर्म , जयश्रीकृष्णीपंथ आदी विविध अन्वर्थक नावे दिली गेली .
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*‼श्रीचक्रधर शरणम्‼*
*🙏दंडवत🌹प्रणाम🙏*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*देवीलाल चौधरी इर्री गोंदिया*
💐💐💐💐💐💐💐
0 टिप्पण्या